बापरे..एमसी स्टॅनची संपत्ती पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल..
‘बिग बॉस हिंदी-१६’ या शो चा विजेता ठरलेला रॅपर एमसी स्टॅन हा नेमका कोण आहे. आणि त्याला कशाचे वेड आहे. तो ‘बिग बॉस’ पर्यत कसा पोहचला...या सर्वांची उत्तरे हवी असतील तर ही बातमी नक्की वाचा..
X
‘बिग बॉस हिंदी १६’ चा विजेता ठरलेला एमसी स्टॅनला कव्वालीचे वेड होते. मात्र त्याने आपल्या रॅपने प्रेक्षकांना अक्षरशा वेड लावले. एमसी स्टॅन हा पुण्याचा रहिवासी आहे. त्याचे खरे नाव अल्ताफ तडवी असून तो वयाच्या १२ व्या वर्षापासून कव्वाली गातो. एमसी स्टॅनने अनेक गाणी गायली आहेत. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही काम केले आहे. त्याच्या गाण्याला यूट्यूबवर जवळपास २१ मिलियन व्हूयज आहेत. त्याच्या या व्हूजने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेवून पोहचवले आहे. ‘बिग बॉस हिंदी १६’ चा अंतिम सोहळा रविवारी १२ फेब्रुवारी रोज पाडला. या अंतिम सोहळ्यात रॅपर एमसी स्टॅनने सर्वाधिक वोट मिळवत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पहिल्याच दिवसांपासून एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरातील चर्चेचा चेहरा राहिला होता. त्याच्या वेगळ्या स्टाईलने घरातील सर्व सदस्यांची मने त्याने जिंकली होती. आणि प्रेक्षकांना सुद्धा भूरळ पाडली होती.
‘बिग बॉस हिंदीच्या १६’ व्या पर्वातील अंतिम विजेत्यासाठी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र अखेर एमसी स्टॅनने ही ट्रॉफीवर आपले नाव कोरले. एमसी स्टॅन ‘बिग बॉस-१६’ चा विजेता ठरल्यावर त्याला बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली आणि त्यासोबतच स्टॅनला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली. त्यासोबतच एमसी स्टॅनला हुंडई ग्रॅन्ड आय१० निओस ही गाडी सुद्धा भेट देण्यात आली.
एमसी स्टॅन हा जरी एक रॅपर असला तरी त्याचे राहणीमान हे उच्च दर्जाचे आहे. २३ वर्षीय एमसी स्टॅन हा लक्झीरियस आयुष्य जगतो. बिग बॉस १६ च्या घरात तो अनेकदा आपल्या गळ्यात एक चेन घालताना दिसून आला. त्याचा त्या चेनची घरातील सदस्यांना सुद्धा भूरळ पडली होती. त्या चेनची किंमत दीड कोटी रुपये इतकी असल्याचे स्टॅन याने घरातील आपल्या सदस्यांना सांगितले होते. एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरात जे शूज घालून वावरायचा त्या शूजची किंमत ही जवळपास ८० हजार रुपये इतकी आहे. तर एमसी स्टॅनला एका कॉन्सर्टमधून खूप मोठी रक्कम मिळते, असा दावा मिडीया रिपोर्टमधून करण्यात आला आहे. एमसी स्टॅन हा जळळपास सध्या १६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असल्याचे मिडीया रिपोर्टमधून समोर आले आहे.