Home > Entertainment > Netflix वर ट्रेंड करणाऱ्या या आहेत टॉप 5 वेब सीरिज

Netflix वर ट्रेंड करणाऱ्या या आहेत टॉप 5 वेब सीरिज

Netflix वर ट्रेंड करणाऱ्या या आहेत टॉप 5 वेब सीरिज
X

संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १ मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजच्या सध्या जोरदार चर्चा आहे. भारतात ही सीरिज ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांचाही सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टफ्लिक्सवर २०२४ मध्ये अनेक चित्रपट व सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. यापैकी काही कलाकृती सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहेत. तुम्ही जर वीकेंडला ओटीटीवर चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा विचार करत असाल तर या कलाकृती पाहू शकता. पाहूयात नेटफ्लिक्सवरील या ट्रेंडिंग कलाकृतींची यादी.


1. हीरामंडी: द डायमंड बाजार:

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ही पीरियड ड्रामा सीरिज ब्रिटिश भारतातील लाहोरमधील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवनावर आधारित आहे.

1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ती Netflix वर 1 नंबरवर ट्रेंड करत आहे.

2. द ग्रेट इंडियन कपिल शो:

कपिल शर्माचा हा विनोदी शो तुम्हाला हसवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

रणबीर कपूर-नीतू कपूर, रोहित शर्मा, आमिर खान, विकी कौशल आणि सनी कौशल यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

प्रत्येक वीकेंडला नवीन भाग प्रदर्शित होतात.

3. डेड बॉय डिटेक्टिव्ह:

तुम्हाला मिस्ट्री आणि थ्रिलर आवडत असल्यास, ही तुमच्यासाठी योग्य सीरिज आहे.

आठ भागांची ही सीरिज सध्या Netflix वर 3 नंबरवर ट्रेंड करत आहे.

4. बेबी रेनडिअर:

ब्लॅक कॉमेडी, ड्रामा आणि थ्रिलरचा मिलाफ असलेली ही सात भागांची सीरिज आहे.

सध्या Netflix वर 4 नंबरवर ट्रेंड करत आहे.

5. क्वीन ऑफ टियर्स:

अडचणीत सापडलेल्या एका विवाहित जोडप्याची गोष्ट सांगणारी ही कोरियन सीरिज आहे.

16 भागांची ही सीरिज कॉमेडी आणि रोमान्सचा समावेश करते आणि सध्या Netflix वर 5 नंबरवर ट्रेंड करत आहे.

Updated : 4 May 2024 11:42 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top