'देवल मिसळ': मिसळ नेमकी कोणाची ?
X
अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत अनेक कलाकार उद्योग जगतात पाऊल ठेवतं आहेत. 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील कलाकार तुषार देवल आणि त्याची पत्नी स्वाती देवल यांनी नुकतेच बोरीवली पूर्वेत एक नवीन हॉटेल सुरू केले आहे. हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पार पडले हे खरे असले तरी या हॉटेलचं नेमकं चवदार आकर्षण काय आहे हे जाणून घेऊया!
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्याकरिता बोरिवली पूर्व येथे भव्य मिसळ महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात तुषार व स्वातीने ‘देवल मिसळ’ स्टॉल लावला होता. याचं कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आता तुषार व स्वातीने एक पाऊल पुढे टाकतं स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे.
कलाकार मंडळी स्वतःचं कॅफे, हॉटेल, फूड ट्रक सुरू करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने दादरमध्ये नवं हॉटेल सुरू केलं होतं. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय संगीत संयोजक व संगीतकार तुषार देवलने पत्नी स्वाती देवलसह स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मिसळ आणि इतर मराठी पदार्थांचा समावेश आहे. हॉटेलमध्ये एक सुंदर आणि आरामदायी वातावरण आहे.
बोरीवली पूर्वेला तुषार व स्वातीचं ‘देवल मिसळ’ हे नवं हॉटेल आजपासून सर्व खवय्यांसाठी खुलं केल आहे. पियूष गोयल यांनी खास उपस्थित राहून तुषार व स्वातीला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर फुग्यांनी सजावट केली होती. तुषार व स्वातीचे मित्रमंडळी, नातेवाईक सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करून दोघांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
तुषार आणि स्वाती यांना या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय नेते हॉटेलच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर. प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत देवल मिसळचे अनावरण झाले
तुषार देवल याने या नवीन व्यवसायाबाबत बोलताना सांगितले, "मी आणि माझी पत्नी स्वाती दोघेही मिसळ खूप आवडीने खातो. आणि आता आम्ही आमचं स्वतःचं मिसळ हॉटेल सुरू केलं आहे. मला आशा आहे की आमची मिसळ लोकांना आवडेल आणि ते येथे येऊन आनंद घेतील." असा आशावाद तुषारने व्यक्त केला आहे.