एक काळ असा होता ,जेंव्हा दीपिका डोळे उघडायला सुद्धा घाबरायला लागली होती
X
डिप्रेशन एक अशी गोष्ट आहे की ज्यातून बाहेर पडण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात .पण हे सामान्यतः सर्वानाच येत का? आणि आलं तर हे फार भयंकर असेल का? असे प्रश्न कित्येकांना पडतात. दीपिका पदुकोण आपल्यातील प्रत्येकाला हे नाव माहित आहे . एक बॉलीवूड मध्ये टॉपची अभिनेत्री पण तिच्या क्षेत्रात टॉपला जात असताना कधीकाळी ती तिच्या रूमच्या बाहेर सुद्धा पडत नव्हती ,लोकांशी बोलणं ,काहीतरी बघणं , इतकंच काय डोळे उघडणं सुद्धा तिच्या जीवावर यायचं ... आपल्या आयुष्यात नक्की हे काय चालू आहे हेच तिला कळत नव्हतं ज्याचं नाव होतं "डिप्रेशन"
पण या डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी दीपिका ने काय केलं?

माणसाला डिप्रेशन अचानक येत नाही . त्याच्या मनातील गोष्टी जर पूर्ण नाही झाल्या, दररोजच्या आयुष्यात फक्त अनपेक्षित गोष्टी घडत गेल्या तर माणूस नाराज होत जातो ही नाराजी इथपर्यंत वाढते की त्या व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीतला रस निघून जातो . कधी कधी माईंडच लॉस्ट होत ,दीपिकाच्या आयुष्यात सुद्धा ही वेळ आली होती दीपिकाचं यश आणि ग्लॅमर पाहता कोणालाच पटणार नाही हे कधी काळी , दीपिका या परिस्थितीतून गेली आहे. पण मोकळेपणाने दीपिका या गोष्टीवर बोलताना दिसते.

ती म्हणते,"जर मला एखादी इजा झाली ,तर माझं मन ती लवकर बरी व्हावी यासाठी अनेक गोष्टी करत असत आणि त्या स्वीकारत सुद्धा असतं ... पण जिथे मनच आजारी असेल तिथं मी काय करायचं ?हा मोठा प्रश्न होता... त्यामुळे तिने वाचायला सुरुवात केली ,स्वतःला ओळखायला पुन्हा सुरुवात केली . तिने आपल्या पालकांशी आणि मित्रांशी ,मैत्रिणींशी बोलायला सुरुवात केली आणि डिप्रेशन ही वेगळी गोष्ट नाहीये Its Normal ते सामान्य आहे... पण त्यावर काम करणे गरजेचं असल्याचं दीपिका सांगते . हे कोणासोबत ही घडू शकते त्यामुळे त्यामध्ये लाजण्यासारखे गोष्ट अजिबात नाहीये ,आपल्याला काय होतं हे जर आपल्याला कळत नसेल तर डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं आहे . आपली फॅमिली आणि मित्रपरिवार आणि डॉक्टर यांच्या मदतीने दीपिका यातून बाहेर पडली .
Live Love Laugh या NGO ची स्थापना दीपिकाने का केली ?
दीपिका ने "Live Love Laugh "नावाची NGO सुद्धा स्थापन केली आहे. नैराश्य, चिडचिडेपणा या परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांना जागृत करण्यासाठी या फाउंडेशनची स्थापना तिने केली . यामध्ये मानसिक आरोग्य ,मानसिक स्थिती आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी अनेक उपक्रम ती राबवताना दिसते ,स्वतःला आलेला अनुभव हा जगातील कोणत्याही व्यक्तीला येऊ नये आणि जर आलाच तर त्या व्यक्तीला आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी दीपिकाने या संस्थेची स्थापना केली आहे . बेंगलोर मध्ये Live Love Laugh फाउंडेशन चे ऑफिस आहे ,अशी एक NGO जी मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करते.