अरे काय..! चप्पल तुटली तरी अभिनेत्री ट्रोल
X
अभिनेत्री डेजी शाह नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. यादरम्यान ती खूपच अस्वस्थ दिसत होती. वास्तविक, कार्यक्रमात पोहोचताच डेझीची चप्पल तुटली आणि त्यामुळे ती रस्त्याच्या मधोमध जाऊन बसली. यादरम्यान पापाराझींनी तिला पकडले, ज्यामध्ये ती बसून तिचे चप्पल ठीक करताना दिसत आहे. झालं आता ती अशा प्रकारे ती कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ट्रॉल करणारे येणार नाहीत असं थोडी? त्यांत डेजी शाह ट्रोल होऊ लागली काय आहे प्रकार पाहुयात..
या व्हिडिओमध्ये एक फोटोग्राफर डेझीला म्हणतो, 'काही हरकत नाही मॅडम, टेक इट इझी. पण तुमची गाडी आता पुढे गेली.' यावर डेझी म्हणते- 'आयेगा वो लेकर वापस'. त्यानंतर तो योतो आणि ती तुटलेली चप्पल बदलून शूज घालते. मग नंतर डेझी शूज घालून पापाराझींना पोझ देत..
लोकांनी डेझीला ट्रोल केले
पण डेजीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिला जोरदार ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'एवढी महागडी चप्पल घेण्याचा काय अर्थ आहे. 100 रुपयांची घ्या वर्षभर चालेल. तर दुसर्या यूजरने लिहिले की, 'स्वस्त वस्तू चांगल्या असता अशा महागड्या गोष्टींमुळे अपमानच होतो. त्याचबरोबर काही लोक डेझीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
जय हो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
डेजी शाह 2014 मध्ये सलमान खानसोबत 'जय हो'मध्ये दिसली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू, पुलकित सम्राट, महेश मांजरेकर असे अनेक सेलिब्रिटी होते. 'जय हो' व्यतिरिक्त डेजी 'हेट स्टोरी 3' आणि 'रेस 3' मध्ये दिसली आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकले नाहीत, मात्र या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.