Home > Entertainment > आशा भोसले यांनी विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर धरला ठेका!

आशा भोसले यांनी विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर धरला ठेका!

आशा भोसले यांनी विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्यावर धरला ठेका!
X

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून गाऊन झाली. आपल्या 81 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत 16,000 गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतही गाणी गायली आहेत.

अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला खूप पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये त्या विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' हे लोकप्रिय गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 'तौबा तौबा' या गाण्याला आपला आवाज देणारा गायक करण औजला यानेही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चाहतेही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि आशा भोसले यांच्या गाण्याचे आणि आवाजाचेही कौतुक होताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर करण औजला याने प्रतिक्रिया देत म्हणाला की, हा क्षण त्याच्यासाठी खूप खास आहे, जो तो नेहमी लक्षात ठेवेल.

आशा भोसले यांनी गायले 'तौबा तौबा' गाणं

कडक एफएमने आशा भोसले यांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आशा भोसले करण औजलाचे प्रसिद्ध गाणं 'तौबा तौबा' गाताना दिसल्या. गाण्यासोबतच त्यांनी खास स्टाइलने गाण्याच्या हुक स्टेपवर ठेका देखील धरला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "@karanaujla आणि @vickykaushal09 हे नक्की पहा!"

Updated : 30 Dec 2024 12:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top