Home > ‘हा’ अभिनेता उद्या बांधणार गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीशी लग्नगाठ

‘हा’ अभिनेता उद्या बांधणार गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीशी लग्नगाठ

‘हा’ अभिनेता उद्या बांधणार गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीशी लग्नगाठ
X

गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawali) यांची मुलगी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) उद्या (८ मे) विवाह बंधनात अडकणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात हा विवाह सोहळा पार पडणार असून खास मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी मिळवली असल्याचं अक्षयने सांगितलं आहे.

हे ही वाचा...

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला. २९ मार्च रोजी त्यांचा विवाह सोहळाही पर पडणार होता. परंतू कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर तो रद्द करण्यात आला. आता विवाह सोहळ्याची सर्व तयारी झाली असून विशोष म्हणजे अरुण गवळी यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडणार आहे. अरुण गवळी सध्या कोरोनामुळे परोलवर बाहेर आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “आम्ही लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. मला मंगळवारी रात्री पोलिसांकडून परवानगीचा मेल आला. त्यानंतर लगेचच आम्ही ८ मे ही लग्नाची तारीख ठरवली. आम्ही लग्नाची शॉपिंग आधीच करून ठेवली होती. २९ मार्चला लग्न पार पडेल या दृष्टीने आम्ही सगळी तयारी केली होती. त्यामुळे आता फार कष्ट करावे लागणार नाही.”

मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयने सांगितलं.

अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. अक्षयची दुसरी ओळख म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्याशी त्याचं नात आहे. अक्षयची आजी दादा कोंडके यांची बहिण होती. तर महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.

Updated : 7 May 2020 1:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top