अजय देवगनचा "मैदान" मैदान गाजवेल का ?
X
एखादा खेळ हा ,त्या खेळातील खेळाडूंमुळे गाजतो किंवा त्या खेळाच्या प्रशिक्षकामुळे नावारूपास येतो . भारतातील अनेक खेळाडू ज्यांनी इतिहास रचला ,हे क्वचितच लोकांना माहीत आहेत . त्या खेळाडूंच्या बायोपिक मुळे साधारण माहिती आपल्याला मिळते. आता अशीच एक स्टोरी अजय देवगन घेऊन येतोय. मैदान या चित्रपटातून . बोनी कपूर यांनी प्रदर्शित केलेला मैदान हा चित्रपट ३ जून ला सर्वांच्या भेटीस येत आहे .
"मैदान"नक्की कोणावर आधारित आहे ?
या चित्रपटात फुटबॉलविषयी इतिहास दिसतो . भारताची टीम दिसते . हे फुटबॉल चे मैदान गाजवणारा प्रशिक्षक होता . हैदराबादमधील प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम याच्या जीवनावर ही स्टोरी आहे. यामध्ये अजय देवगन त्याचबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी सुद्धा दिसणार आहे . सय्यद अब्दुल रहीम ज्यांनी भारतीय संघाचे काही अत्यंत गौरवशाली काळात नेतृत्व केले.
त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना अजयने सांगितले आहे की, “मैदान’ हा माझा वैयक्तिक आवडता आहे. मी हे क्वचितच सांगतो, हा मी केलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. तो खूप छान आहे. चित्रपटाचा प्रत्येक विभाग, कथाकथन, दिग्दर्शन, अभिनय, सर्व काही उत्कृष्ट दिसते.”अतिशय संघर्षातून भारताला फुटबॉल मध्ये यश मिळवून देणारे फुटबॉल चे प्रशिक्षक यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या प्रसंगातून सुद्धा त्यांनी त्यांच्या कामात दाखवलेली तत्परता याविषयी हा सिनेमा चित्रित केला आहे. अजय देवगन ची यातील एक्टिंग तुमच्याही डोळ्यात पाणी आणू शकते ,असं म्हणतात अजय देवगन च्या डोळ्यातच अभिनय आहे आणि या चित्रपटात सुद्धा अजय देवगन ने डोळ्यांनीच प्रेक्षकांना घायाळ केला आहे .
नुकताच या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला आहे .या टीझरला अवघ्या काही तासात असंख्य विव्हज मिळाले आहेत. अनेक चाहत्यांचे असं म्हणणं आहे की, हा चित्रपट नक्कीच हिट होणार. अजय देवगनची एक्टिंग आणि बोनी कपूरचे दिग्दर्शन याचा मेळ बसवत हा टिझर दमदारपणे लॉन्च केला गेला आहे .आता "मैदान"मैदान गाजवेल का ? हे येणारा काळ ठरवेलच ...