सलमान खानला साप चावल्यानंतर काळवीट चर्चेत...
X
अभिनेता सलमान खानला काल शनिवारी साप चावल्याची बातमी समीर आल्यानंतर आता समाजमाध्यमावर सध्या काळवीट जोरात चर्चेत आहे. सलमान खान आणि काळवीट यांचे अनेक फोटो व मिम्स व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एकाने 'आज की पार्टी मेरी तरफ से' असं म्हणत काळवीट नाचतानाचा फोटो शेअर केला आहे.
तर एकाने काळविताच्या तोंडाच्या जागी सापाचे तोंड असलेला फोटो शेअर केला आहे.
अश्या प्रकारचे अनेक फोटो समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. त्यातील काही मिम्सचे हे फोटो...
काय आहे काळवीट प्रकरण -
राजस्थानला 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, या चित्रपटातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे या खटल्यात हे सर्वजण आरोपी होते. अनेक वर्ष सलमान खान ची ही केस चालू होती या केस मध्ये सलमान खान ला जोधपूर सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावेळी सलमानला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. यामध्ये जे इतर उर्वरित आरोपी होते त्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी सलमान खानची देखील या केस मधून निर्दोष सुटका झाली आहे.