"लग्नानंतर तुला मुलांकडे लक्ष द्यावं लागेल ना"... मिताली राजचा लग्नाबाबत खुलासा!
X
भारतीय महिला क्रिकेटमध्ये महान महिला क्रिकेटपटूंपैकी एक मिताली राज. आंतरराष्ट्रीय खेळात अनेक विक्रमांची धारक मितालीने नेहमीच भारतीय क्रिकेटला तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा वरचढ ठेवले आहे. अजूनही अविवाहित असलेल्या मितालीने आयुष्यभर क्रिकेटमध्ये स्वत:ला वाहून घेतले. नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नासाठी झालेले प्रयत्न आणि मुलांसह झालेली भेट याचा खुलासा केला. पॉडकास्टमध्ये हजेरी लावलेल्या मिथाली राजने तिच्या मावशीने सुचवलेल्या मुलासह लग्नाबद्दल झालेल्या चर्चेरसंबंधी सांगितलं. आणि तिच्या काळातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असूनही, मितालीने उघड केले की तिला अनेक संभाव्य खेळाडूंनी क्रिकेट सोडण्यास सांगितले कारण लग्नानंतर मुलांची काळजी घेणे ही तिची प्राथमिक जबाबदारी असेल.
या सगळ्या प्रश्नांवर मिथाली राजने सांगितले की, "मला ते समजले नाही, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आता या सर्व भेटी माझ्या आईच्या बहिणीने ठरवलेल्या होत्या, म्हणून मी बोलण्यास होकार दिला. त्यानंतर थेट लग्नानंतरच्या चर्चा सुरु व्हायच्या. मी बॅकफूटवर होते, कारण मी कधीच कल्पना केली नव्हती आणि मी नेहमी भारतीय क्रिकेटबद्दल विचार करायचे. त्यामुळे मला किती मुले हवी आहेत किंवा मला क्रिकेट सोडावे लागेल अशी विधानं ऐकून मला धक्का बसला होता,” असं मिथालीने रणवीर अलाहाबादियाच्या शोमध्ये सांगितलं.
"तेव्हा मी भारतीय कर्णधार होते. त्यांच्यापैकी एकाने सांगितले की तुला क्रिकेट सोडावे लागेल, कारण लग्नानंतर तुला मुलांची काळजी घ्यावी लागेल. मला अजूनही ती विधानं पचलेली नाहीत. मला त्याचे नाव आठवत नाही. तो विचित्र प्रश्न त्याने मला विचारल होतं की, 'माझ्या आईला काही झालं तर तू तिची काळजी घेशील की जाऊन क्रिकेट खेळशील?' सरळ उत्तर दिले, 'हा कसला प्रश्न आहे?' तो म्हणाला 'मला हे जाणून घ्यायचे आहे की तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे.' आणि मी उत्तर दिले, 'ते परिस्थितीवर अवलंबून असेल.'मी पुढे काय बोललो ते मला नीट आठवत नाही, असं मिथालीने सांगितलं.
मितालीने यावेळी सांगितले की, तिच्या काही मैत्रिणींनी तिला काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास सांगितले, अन्यथा तिला पार्टनर कधीच मिळणार नाही.
"मला आठवते की, माझ्या एका क्रिकेटर मित्राने सांगितले होते की, तुला थोडं जुळवून घ्यावं लागेल. कारण तुला अशी व्यक्ती कधीच सापडणार नाही जी तुला त्याच जीवनशैलीचे अनुसरण करू देईल. मी तोपर्यंत काही ठरवलं नव्हतं, पण त्यावेळी माझ्यात काहीतरी बदल झाला. मला वाटलं की, माझ्या पालकांनी त्याग केला आहे, मीदेखील खूप त्याग केला आहे आणि एका अनोळखी व्यक्तीसाठी मी ते सोडून देणार नाही. ज्याला त्याच्या घराची काळजी घेण्यासाठी मी करिअर सोडावं असं वाटतं,” असं ती म्हणाली.