अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? अभिनेत्रीने केला खुलासा
Shivanipatne | 27 Aug 2023 11:51 AM IST
X
X
अभिनेत्री अदा शर्मा, अलीकडेच चर्चेत आली आहे कारण तिने अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा पूर्वीचा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला आहे.
टेली चक्कर यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, त्यांची अदा शर्माशी संपर्क साधला असता तिच्या टीमने हे वृत्त खरे असल्याचे सांगितले आहे. परंतु अभिनेत्री या घरामध्ये कधी शिफ्ट होत हे माहित नाही.
सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. २०२१ मध्ये, मुंबई स्थित, समुद्राभिमुख फ्लॅट भाड्याने देण्यात आला होता. राजपूत दुमजली मालमत्तेसाठी दरमहा साडेचार लाख रुपये देत होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराचे भाडे वाढविण्यात आले होते. त्यामुळे हे घर चर्चेत होते. अनेकांना हे घर विकत घ्यायचे होते. अखेर अदा शर्मासोबत डील झाली आणि हे घर तिने खरेदी केले.
Updated : 27 Aug 2023 11:55 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire