कोरोनाची सुट्टी... सोनाली कुलकर्णी आणि मुलीची उद्योग मालिका
X
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने ३१ मार्च पर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. ऐन परिक्षेआधी मिळालेल्या आयत्या सुट्टीमुळे बच्चे कंपनी मात्र भलतीच खुश आहे. मात्र, १५ दिवसांची सुट्टी मिळाल्यावर करायचं काय हा देखील मोठा प्रश्न आहे.
बाहेर खेळून कोरोनाची लागण होण्याची भीती असल्यामुळे पालक काही केल्या मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर पडू देणार नाहीत. मग सुट्टीचं करायचं काय? असाच काहीसा प्रश्न सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिची मुलगी कावेरीला पडला.
मग काय सुट्टीत काहीतरी उद्योग करायला हवेच ना? म्हणुन सोनालीने मुलीसोबत छानशी रांगोळी काढण्याचा उद्योग चालवला. या सुट्टीतील उद्योगात कावेरी आणि आई सोनालीने मिळून मस्त रांगोळ्या काढल्या आहेत. पाहा त्यांची सुट्टीतील उद्योगमालिका...
सुट्टीतील उद्योग मालिका ☺☺😚 #homeholidays #MotherDaughter #funtimes pic.twitter.com/0CQkQPrA4P
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 17, 2020