‘हिंदूंसाठी जेवणाची वेगळी लाईन आहे का?’ या प्रश्नाने दुखावली ‘ही’ अभिनेत्री
X
कोरोनाच्या संकटात बहुतेक सिनेकलाकार अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री सना खान (Sana Khan) ही देखील कोरोनामुळे गरजूंना जेवण आणि खाण्याच्या वस्तू पुरवून मदत करत आहे. या कामासाठी तीला देणगी स्वरुपात आर्थिक सहाय्य करणाऱ्यांचे तीने इन्स्टाग्राम वर व्हिडीओच्या माध्यामातून आभार मानले आहेत.
हे ही वाचा..
- विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगणार?
- ‘हा’ अभिनेता उद्या बांधणार गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीशी लग्नगाठ
- दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका मालविका मराठे यांचं निधन
सोबतच तीने हे मदतकार्य करत असताना आलेला एक दु:खद अनुभव ही सर्वांसोबत शेअर केला. एका कॅम्पमधील मजूरांनी “तुम्ही आणताय़ ते जेवण फक्त मुस्लीमांसाठी आहे का? तर कोणी 'हिंदू आणि मुस्लीमांसाठी वेगवेगळी लाईन आहे का?' असे प्रश्न विचारल्यामुळे ती अस्वस्थ झालीय.
कोरोनाच्या या संकटात धार्मिक द्वेष पसरवणारे अनेक संदेश लोकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीही पसरली आहे. असं मत तीने व्यक्त केलंय. या व्हिडीओतून सनाने एकतेचा संदेश देत अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. पाहा व्हिडीओ...