थाटामाटात पार पडला शोभिता आणि नागा चैतन्यचा विवाहसोहळा
X
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यचे यांचा विवाह सोहळा ४ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. बहुप्रतिक्षित विवाह आंध्र प्रदेशातील हैदराबादमधील अभिनेत्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये झाला, हे अक्किनेनी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे, कारण त्याची स्थापना नागा चैतन्यचे दिग्गज आजोबा, अक्किनेनी नागेश्वर राव यांनी 1976 मध्ये केली होती. लग्नात शोभिता सोनेरी कांजीवरम साडी आणि पारंपारिक सोन्याचे दागिने परिधान केलेली दिसते. तत्पूर्वी, शोभिताने मंगलस्नानम, हळदी समारंभ आणि पेल्ली कुथुरु यासह त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभातील झलक देखील सोशल मीडियावर शेअर केली होती.
नागा चैतन्य आणि शोभिता हे लग्न होण्यापूर्वी जवळजवळ दोन वर्षे (2022-2024) नात्यात होते. 2023 मध्ये नागा चैतन्य आणि शोभिता यांच्यातील नात्याबद्दल अफवा सुरू झाल्या, एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये नागा मिशेलिन स्टार शेफ सुरेंदर मोहनसोबत लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये पोज देताना दिसला, तर शोभिता मागे एका टेबलवर बसलेली दिसली, तिने तिचा चेहरा जवळजवळ झाकून ठेवला होता. त्यानंतर मात्र, लवकरच तो फोटो हटवण्यात आला. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चेला अधिक उधान आले. तत्पूर्वी, नागा चैतन्यने शोभितासोबत एक नवीन अध्याय सुरू करण्याविषयी सांगितले आणि एका मुलाखतीत सांगितले की, "मी शोभितासोबत एक नवीन प्रवास सुरू करण्यासाठी आणि एकत्र जीवन साजरे करण्यास उत्सुक आहे. मी तिच्याशी खोलवर जोडलो आहे, ती मला सुंदरपणे समजून घेते आणि माझ्यातील एक पोकळी भरून काढते. हा पुढचा प्रवास खूप छान असणार आहे." नागा चैतन्यचे यापूर्वी अभिनेत्री समंथा प्रभूसोबत लग्न झाले होते पण २०२१ मध्ये ते वेगळे झाले.