Home > Entertainment > जिया खान प्रकरणातून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता.. | Jia Khan , Sooraj Pancholi

जिया खान प्रकरणातून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता.. | Jia Khan , Sooraj Pancholi

जिया खान प्रकरणातून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता.. | Jia Khan , Sooraj Pancholi
X

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. निकालाच्या वेळी सुरज कोर्ट रूममध्ये उपस्थित होता. 'तुमच्याविरुद्ध पुरावे पुरेसे नाहीत, त्यामुळे निर्दोष सुटका', असे न्यायालयाने म्हटले आहे. सूरजवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता.

जियाने ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. आता या घटनेला 10 वर्षांनंतर यावर निर्णय आला आहे. जियाच्या आईच्या तक्रारीवरून अभिनेता आणि बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. नंतर जामीन मंजूर झाला.

जियाच्या घरातून पोलिसांना 6 पानी सुसाईड नोट मिळाली होती. त्यानुसार सूरजसोबतच्या ताणलेल्या नात्यामुळे जिया खूप नाराज होती. यानंतर जियाची आई राबिया खान यांनी सूरजविरोधात गुन्हा दाखल केला. सूरज हा अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा आहे.

Updated : 29 April 2023 7:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top