‘पुर्ण फी भरा तरच मुलांला शिकऊ’ नवी मुंबईतील शाळेचा प्रताप, पालक आक्रमक
X
‘काही दिवसांपुर्वीच मी माझ्या मुलाची शाळेची थोडी फी भरली. सध्या हातात काहीच नसल्याने थोडी थोडी फी भरतेय पण शाळा प्रशासन 8 दिवस ऑनलाइन शिकवतं आणि लगेच कनेक्शन बंद करतं. आम्ही थोडे थोडे करुन पुर्ण पैसे भरतो पण मुलांचं नुकसान करु नका.’ ही मागणी आहे नवी मुंबईतील रोहिणी शिंदे या आईची.
शाळांनी पालकांना फिससाठी तगादा लावू नये. कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका. असे सक्त आदेश राज्य सरकारने दिले असतानाही अशा काही शाळा आहेत ज्यांनी या आदेशाला हरताळ फासला आहे. या शाळांनी ज्या पालकांनी मुलांची फी भरली नाही अशा पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. असाच काहीसा प्रकार उल्वे नोड येथील एका शाळेत झाला आहे. शाळेच्या या मनमानी कारभारा विरूद्ध पालकांनी एल्गार मोर्चा काढला.
या बाबत रोहिणी शिंदे म्हणाल्या की, ‘आमची मुलं आज 8 वी ते 9वीत शिकत आहेत. पण आम्ही पुर्ण फी न भरल्यामुळे शाळेने आमच्या मुलांची ऑनलाईन शिकवणी बंद ठेवली आहे. शाळेतून फोन येतात मुलांची पुर्ण फी भरा तरच पुढचं शिकऊ. पण लॉकडाउनमुळे सगळचं बंद असल्याने हातात पैसेही नाहीत. शासनाने यावर काही तोडगा काढावा.’ अशी पालकांनी केली आहे.
https://youtu.be/YnMJO1m4Zwc