पोरहो दप्तर भरायला घ्या... अखेर २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार
X
वर्षभर कोरोना महामारीमुळं बंद असलेल्या शाळांची आता पुन्हा घंटा वाजणार आहे. येत्या २७ जानेवारीपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले असून केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणं असणार बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च मध्ये बंद झालेल्या शाळा आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा येत्या २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून या शाळा सुरू कराव्यात. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांच्या टेस्ट करणे, शाळेच्या इमारतीचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे, पालकांना विश्वासात घेऊन शाळा सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळांमध्ये येण्यासाठी महामंडळाच्या बसेस देखील येणाऱ्या काळात निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मंत्री गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावरच असल्याचं सांगितलं होतं. आता मुंबई आणि ठाणे महापालिका वगळता राज्यभरातील शाळा २७ जानेवारी पासून सुरू होणार आहेत.