Home > क्लासरूम > व्हॅलेंटाईन डे निमीत्त तुमच्या बाबू शोनाला फ्री कुपनच्या लिंक पाठवताना सावधान!

व्हॅलेंटाईन डे निमीत्त तुमच्या बाबू शोनाला फ्री कुपनच्या लिंक पाठवताना सावधान!

व्हॅलेंटाईन डे निमीत्त तुमच्या बाबू शोनाला फ्रि कुपनच्या लिंक पाठवताय मग ही बातमी नक्की वाचा

व्हॅलेंटाईन डे निमीत्त तुमच्या बाबू शोनाला फ्री कुपनच्या लिंक पाठवताना सावधान!
X

व्हॅलेंटाईन डे निमित्त व्हॉट्सअॅप वर 'ही लिंक ओपन करा मग तुम्हाला कुपन, गिफ्ट फ्री मिळेल' असे अनेक मेसेज येत असतात. अति उत्साहातून अनेक जण या लिंक ओपन करतात आणि सायबर क्राइमचे शिकार होतात. असाच एक मेसेज सध्या सोशलमीडियावर व्हायरल होतोय.


या मेसेजमध्ये 'व्हॅलेंटाईन डे निमित्त ताज हॉटेल फ्री कुपन, गिफ्ट देत असल्याचं म्हटलं आहे. एवढच नाही तर लकी कुपन मिळालं तर तुम्हाला 7 दिवस ताज हॉटेल मध्ये रहाण्याची संधी' असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. हा मेसेज तुम्हालासुध्दा आला असेल. पण या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन मुंबई सायबर पोलीसांच्या ठाणे गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे.


व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर काही लोक हेतूपर्वक बनावट लिंक तयार करत आहेत. त्याद्वारे विविध मोफत बक्षिसांचे आमिष दाखवत आहेत. सोशल मीडियावर याचा प्रचार सुरू असून अनेक जण यातून फसले गेले आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे निमित्त ऑनलाईन खरेदी करताना योग्य खबरदारी घ्यावी. फ्री गिफ्ट किंवा फ्री कुपन कार्ड संबंधी अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नये. त्यामध्ये आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, असं मुंबई सायबर पोलीस ठाणे गुन्हे शाखेच्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे.

Updated : 2 Feb 2021 8:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top