‘कष्टाचं चीज झालं लेक तहसीलदार झाली’
X
काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा येथील इंद्रायणी गोमासे या उत्तीर्ण झाल्या. इंद्रायणी यांचे वडील मुरलीधर गोमासे हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलीच्या या यशाबद्दल सांगताना मुरलीधर गोमासे सांगतात की, “मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त तीन एकर जमीन. तीन मुली आणि एक मुलगा त्यांच्या शिक्षणाचं ओझं. मात्र मी मुलीचं शिक्षण थांबवलं नाही. शेती पिकवून त्यांनी मुलीला शिकवल. कष्टाचं चीज झालं लेक तहसीलदार झाली.”
“कृषी पदवी मिळवून शासकीय कार्यलयात नोकरी मिळवली तर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचू शकतील. नाही तर शेतीवर अनेक संशोधन केली जातात. पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. या करता मी राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली.” असं इंद्रायणी सांगतात. प्रबळ इच्छाशक्ती व परिश्रम करण्याची जिद्द असली की सर्व शक्य आहे, याचं इंद्रायणी या उदाहरण आहेत.