‘मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षण विभागाने समन्वय ठेवणं गरजेचं’
X
पुणे: शिक्षण पद्धतीत कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत? मुलांना या कठीण काळात देखील कसं शिक्षण दिलं जावं? यासंदर्भात माजी विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. शाळा बंद असल्या तरी मुलांना शिक्षण मिळले पाहिजे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आदेशानुसार काम सुरू असून मुलांना विविध माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले. पालकांना जो प्रकर्षाने मुद्दा जाणवत आहे म्हणजे शिक्षण शुल्क याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी मुद्दा उपस्थित करून याबाबत तक्रार करण्यासाठी अधिकारी नेमण्याची सूचना केली. तात्काळ दखल घेऊन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रार करता येईल आणि ताबडतोब तक्रार असलेल्या शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. बालचित्रवाणीला सक्षम करून शिक्षण विभागाने स्वतःची वाहिनी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा तसेच बालचित्रावणी कडे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्याचा Virtual क्लासरूम, ऑनलाईन शिक्षणासाठी उपयोग करून घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आकाशवाणी कम्युनिटी रेडिओ चा वापर करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली. शाळेत समुपदेशकांची पदे भरलु असले तरी देखील यापदात वाढ करण्याची मागणी देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली. या सर्व विषयांवर माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यासाठी मंत्री वर्षाताई यांनी प्रशासनास सूचना दिल्या.
https://youtu.be/Q4cluyqmVLk