दिव्या अय्यर... भंडाऱ्यातील मुलांची आधुनीक सावित्री
X
भंडारा : शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले असले तरी मात्र ग्रामीण भागातील मुलांकरीता ऑनलाईन शिक्षण हे दिवास्वप्नच ठरंत आहे. आजही समाजात शिक्षणाचे महत्व ओळखुन स्वतःच्या ज्ञानातुन दुस-यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे जिवंत आहेत याचे जिवंत उदाहरण म्हणजे नरसिंगटोला येथील दिव्या अय्यर ही तरूणी...
दिव्या अय्यर कसल्याही प्रकारचे मानधन न घेता इयत्ता पहिली ते सातवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना निस्वार्थपणे ज्ञानार्जन करते. त्यामुळे दिव्या आज गावातील शाळकरी मुलांसाठी सावित्री ठरली आहे. मोहाडी तालुक्यातील नरसिंगटोला येथील दिव्या अय्यर हिने बि.कॉम.पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले असुन तीला संगणकाचे ज्ञान आहे. दिव्या ची आई पुष्पलताताई तांडेकर यांचं निधन झालेलं आहे. त्या विद्यालय नरसिंगटोला या शाळेत आहार शिजवायला जायच्या. दिव्याला गावातील वास्तव्य परिस्थितीची जाण आहे. मी शिकली, माझ्या गावातील मुलंसुध्दा शिकली पाहिजेत. स्मार्ट फोन नाही म्हणुन ती शिक्षणापासुन वंचित राहु नये. त्यांना शिकवितांना माझ्याही ज्ञानात भर होईल हे विचार मनाशी बाळगुन कसलेही मानधन न घेता आज ती गावातील पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.