अर्थसंकल्पात महिला व्यावसायिकांकडे केलं जातं दुर्लक्ष - उज्ज्वला हावरे
Max Woman | 7 July 2019 1:09 PM IST
X
X
यंदा महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार म्हणून सामान्यांपासून ते कॉर्पोरेट सेक्टरमधील महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. महिला म्हणून निर्मला सीतारामन महिलांचा सर्वाधिक विचार या अर्थसंकल्पात करतील मात्र हाती निराशाच लागल्याचं अनेक महिलांनी सांगितलं. महिला व्यावसायिकांमध्ये या अर्थसंकल्पाबाबत नेमक्या काय चर्चा होत आहे याबद्दल आम्ही बांधकाम व्यावसायिक उज्जवला हावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की या अर्थसंकल्पात व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे फारसा बघितलं गेलं नाही. तसेच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ हा महिलांना होत नाही. ज्या महिलांना व्यवसायात उतरायचे असते त्या स्वतः प्रयत्न करुन पैसा व इतर गोष्टी उभ्या करतात. शासनाच्या योजना या महिलांना आकर्षित करणाऱ्या नसल्यामुळे त्या योजनाचा त्यांना उपयोग होत नाही. या अर्थसंकल्पात महिला व्यवसायिकांकडे लक्ष दिले गेले नाही किमान टॅक्समध्ये सूट इतकंही महिला उद्योजकांना पुरेसे असते. तेही या सरकारने केले नसल्याचं उज्ज्वला हावरे यांनी म्हटलं.
Updated : 7 July 2019 1:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire