Home > बिझनेस > शेअर बाजारा मागील 7 महिन्यांत दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण...

शेअर बाजारा मागील 7 महिन्यांत दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण...

शेअर बाजारा मागील 7 महिन्यांत दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण...
X

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्सने आठवड्याच्या शेवटच्या दिवसात 2.87% म्हणजे 1 हजार 650 अंकांची घसरण नोंदवली. याचे मूळ कारण कोरोनाचे नवीन प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 7 महिन्यांतील बाजारातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. 18 ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स 61,765 तर जानेवारीत 48 हजारांवर बंद झाला होता. 19 ऑक्टोबर रोजी 62,245 हा नवीन विक्रम नोंदवला गेला. तेव्हापासून सेन्सेक्स 5 हजार अंकांनी 8% घसरला आहे.

BSE निर्देशांक 57,107 वर बंद

बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक ५७ हजार १०७ वर बंद झाला. सेन्सेक्सच्या घसरणीत इंडसइंड आणि मारुतीचा मोठा वाटा होता. इंडसइंड बँकेचे शेअर्स 6.01% घसरून बंद झाले. मारुती, टाटा स्टील, एचडीएफसी, एनटीपीसी, बजाज फायनान्स या समभागांमध्येही मोठी घसरण झाली. तर नॅशनल स्टॉकचा निफ्टी 510 अंकांनी किंवा 2.91% घसरून 17,026 वर बंद झाला. निफ्टीमध्ये निफ्टी रियल्टी, मेटल, सरकारी बँक आणि ऑटो निर्देशांक 6.26% घसरले. बाजाराच्या घसरणीची ही प्रमुख कारणे आहेत.

कोरोनाचे नवीन रूप

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे नवीन प्रकार समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी धोकादायक शेअर्स मधुन बाहेर पडण्यास सुरुवात केली. नवीन प्रकाराबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु असे प्रकार दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, इस्रायल आणि हाँगकाँगमध्ये आढळून आले आहेत. हा नवा प्रकार इतर देशांमध्येही पसरण्याची भीती आहे. याचा पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Updated : 27 Nov 2021 10:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top