Home > बिझनेस > आईच्या शिकवणीचा छाया ताईंनी केला व्यवसाय, औरंगाबादकरांना पाडलं मांड्याच्या प्रेमात

आईच्या शिकवणीचा छाया ताईंनी केला व्यवसाय, औरंगाबादकरांना पाडलं मांड्याच्या प्रेमात

नव्या शहरात राहायला आलेल्या छाया कांबळेंनी आपल्या आईच्या हातचा खाल्लेला मांडा आठवला आणि तोच विकत त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला.

आईच्या शिकवणीचा छाया ताईंनी केला व्यवसाय, औरंगाबादकरांना पाडलं मांड्याच्या प्रेमात
X

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून वाळूज महानगर येथील औद्योगिक वसाहतीत आपल्या परिवार समवेत आपल्या मुलांचे शिक्षण करण्या हेतू कामानिमित्त आलेल्या छाया कांबळे या गृहिणीने आपल्या आईने शिकवलेल्या मांडा बनविण्याच्या कलेला उभारी दिली. आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून बजाजनगरात मांडा निर्मितीचे दुकान थाटून स्वतःच्या रोजगार उपलब्धी ला दिशा दिलीय. अतिशय रुचकर आणि जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ म्हणून मांडा या स्वयंपाक कृतीकडे पाहिल्या जातं. प्रथमच वाळूज महानगरातील बजाजनगरात छाया कांबळे या गृहिणीने मांडा निर्मितीचे दुकान थाटल्याने छाया कांबळे यांच्या दुकानावर वाळूज महानगर परिसरातील नागरिक मांडा खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे मातीच्या मडक्यावर शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनविलेला मांडा खाणारे ग्राहक छाया कांबळे यांच्या कलेची स्तुती करत वाळूज महानगरात मांडा मिळत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत छाया कांबळे यांच्याकडे साधा मांडा व पूरणाचा मांडा तेही अल्पदरात औद्योगिक नगरीत मिळत असल्याने परिसरातील मंडळी विदर्भातील या स्वयंपाक कृतीचा चांगलाच आस्वाद घेत आहेत.

Updated : 22 March 2022 12:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top