महिलांनो रोजगारासाठी पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करा
X
सध्याच्या काळात रोजगार कुठे, कसा, कधी मिळेल यांची चिंता प्रत्येक व्यक्तीला सतावत असते. विशेष करून महिला स्वत्व निर्माण करून रोजगार, व्यवसाय करण्याच्या संधीच्या शोधात असतात. अशातच मॅक्सवुमनच्या व्यासपीठावर महिला संबंधित बातम्या तसेच महिलांच्या कलेला वाव देत रोजगार,व्यवसायाच्या संधी संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराची संधी कशी मिळेल? पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग कसा आहे? महिलांनी पर्यटन क्षेत्रात कसं यावं? पर्यटन क्षेत्रात असलेल्या महिला कसे काम करतात? व्यवस्थापन, ग्राऊंड पातळीवर काम कसे करावे? २०१६ महाराष्ट्र पर्यटन धोरण नेमकं काय आहे? महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाची निर्मिती कशी झाली?
राज्यात पर्यटन विकास होण्यासाठी सरकारचं नक्की धोरण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरांसह योग्य मार्गदर्शन करतायेत महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवळे
पाहा हा व्हिडिओ
पर्यटक प्रशिक्षक मनोज हाडवळे सांगतात की, भविष्यात महिलांना पर्यटन क्षेत्रात अधिक रोजगार आणि व्यवसाय करण्याची संधी आहे. सद्यस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास १९ लाख महिलांना रोजगार मिळाला आहे.
सध्या पर्यटनातून रोजगार आणि व्यवसाय उभारण्याची गरज असून कला, कौशल्याच्या आधारे पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहे. महिलांनी स्वतःच्या कलागुणांना ओळखावं आणि संधीचा सकारात्मकदृष्ट्या वापर करत स्वतःच हक्काचं स्थान निर्माण करावं असं मनोज हाडवळे यांनी सांगीतलं.