"फ्रूटी" 300 CR वरून 8000 CR ब्रँडवर नेणारी महिला
X
कोण म्हणतं महिला स्टार्टअपमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत? नादिया चौहान 2003 मध्ये तिच्या वडिलांच्या "Parle Agro " ग्रुपमध्ये सामील झाली. तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती.तेंव्हापासून तिने आतापर्यत कसा वाढवला तिचा व्यवसाय वाचा संपूर्ण लेख ...
तिने तिच्या कंपनीचे अवलंबित्व फ्रुटीवरच ठेवलं नाही तर . तिने आयकॉनिक पॅकेज्ड वॉटर ब्रँड "Baileys" लाँच केला . ज्यामुळे फक्त Baileys चा व्यवसाय 1000 CR+ इतका आहे. या व्यवसायात धाबा ते लांब पल्ल्याच्या बस ऑपरेटर्स सोबत संपर्क ठेवत त्यांनी हा व्यवसाय वाढवला आहे.परिणामी, Parle Agro समूहाची उलाढाल दुप्पट होऊन 5000 सीआर झाली आहे.
तिने 2005 मध्ये "अप्पी फिझ" लाँच केले, जे याआधी कोणत्याच कंपनीने केले नव्हते . मुळात सफरचंदाचा ज्युस असा वेगळ्या चवीत आल्याने लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि त्यावेळी तब्बल 99% बाजारपेठेतील वाटा मिळवून कंपनी फायद्यात आली.
पण शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे ती या सगळ्यात तिचे मूळ उत्पादन म्हणजे फ्रुटी ती विसरली नाही. पुन्हा परत येत तिने फ्रूटीला "Nutrizz" या ब्रँड अंतर्गत वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये लॉन्च केले आणि PET बाटल्यांमध्ये पॅकेजिंग पुन्हा केले जे आजच्या काळातील फ्रुटीसाठी ओळखले जाते.
ब्रँड आणि जाहिराती
ब्रँडचा प्रचार करण्यासाठी, तिने त्यांच्या करिअरच्या शिखरावर असलेल्या योग्य कलाकारांना ब्रँडचा प्रचार करण्यासाठी नियुक्त केले. आलिया भट्ट आणि राम चरण यांनी फंकी कपडे आणि "फ्रूटी फिझ" नावाच्या विचित्र फ्रूटी बाटल्यांसह जाहिरातींमध्ये नवीन फ्लेवर्सची जाहिरात करण्यास सुरुवात केली. तो देखील 300 CR च्या जाहिरात खर्चासह एक मास्टरस्ट्रोक बनला . परंतु 2000 CR+ पेक्षा जास्त महसूल तयार झाला.
फ्रूटीचे आजच्या कमाईचे 48% योगदान आहे. पण, नादियाने ज्या प्रकारे अनेक श्रेणींमध्ये व्यवसाय वाढवला ते कौतुकास्पद आहे.