शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, कल्पकतेने वाचले ७ ते ८ हजार रुपये
Max Woman | 8 July 2020 6:47 PM IST
X
X
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पान वडोद गावातील शेतकरी भाऊसाहेब दौड यांच्याकडे जेमतेम २० गुंठे शेतजमीन आहे. त्यांचे वेल्डीगचे दुकान असून ते १८ वर्षा पासून वेल्डीगचे काम करतात. काही वर्षापासून या परिसरात दुष्काळ, व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. त्यातच लॉकडाउन जाहिर झाल्याने शेतात वखरणी व कोळपणीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. शेतातील कोळपणी व वखरणी कशी करावी या विवंचनेत असतांना या शेतकऱ्याने एक शक्कल लढवली व जुगाड करायचे ठरवले. आपल्या मोटार सायकलीला वखराच्या व कोळपणीच्या पाळ्या बनवत वेल्डीग करून जोडले. यासाठी त्याना २०० रुपयाचे पेट्रोल लागले. त्यांच्या या कल्पनेमुळे जवळपास त्यांचे ७ त ८ हजार रुपये वाचले असून शेतकऱ्याच्या या भन्नाट जुग्गाडाची परिसरा चर्चा सुरु झाली आहे.
https://youtu.be/p7HT-oCTgbk
Updated : 8 July 2020 6:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire