Home > बिझनेस > CSR अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी ५ कोटींची निधी

CSR अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी ५ कोटींची निधी

CSR अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी ५ कोटींची निधी
X

मुलीच्या सक्षमीकऱणासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी RBL बॅंकेने सीएसआर अंतर्गत 5 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उभारला आहे. याचा लाभ २०१९मध्ये हैदराबादमधील फतेहनगर येथे बँकेने वंचित मुलांसाठी दत्तक घेतलेल्या उद्धव आरबीएल स्कूलला होणार आहे. ऑक्टोबर २०२० रोजी 'Donate Miles to Educate-Support Girl Child' या अंतर्गत देणगीसाठी उपक्रम घेण्यात आला होता.

उम्मीद १००० सायक्लोथॉन या उपक्रमाच्या माध्यमातून हा निधी उभारण्यात आला आहे. यावर्षी हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात 2 ऑक्टोबर 2020 रोजी 'डोनेट्स माईल टू एज्युकेशन-सपोर्ट गर्ल चाइल्ड' या उपक्रमाने सुरूवात करण्यात आली. या उपक्रमात आरबीएल बँकेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय चालणे, धावणे आणि सायकलिंग करुन सहभागी होतात. घेतात. या आव्हानाद्वारे एकूण 1 लाख 61 हजार 036 कि.मी. अंतराचे योगदान दिले गेले. दान केलेल्या मैलांचा मागोवा एका अॅपद्वारे घेण्यात आला आणि बँकेने त्या प्रमाणात देणगी दिली.

27 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेच्या लोअर परेल शाखेतून या सायक्लोथॉनला सुरूवात झाली. 14 दिवसांच्या कालावधीत एकूण १२७ जणांनी यात सहभाग घेतला. यामध्ये आरबीएल बँकेच्या 52 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. १४ दिवसात 127 सायकलस्वारांनी एकत्रितपणे 1 लाख 10 हजार 091 कि.मी. अंतराचे योगदान दिले. आरबीएल बँकेच्या एचआर, सीएसआर आणि अंतर्गत ब्राँडिंग प्रमुख शांता वालूरी यांनी सांगितले की, यंदा आरोग्य सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला कार्यक्रमात खूप बदल करावा लागला पण लोकांचा उत्साह आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान यात कुठेही कमतरता दिसली नाही. मुलींच्या शिक्षणासाठीच्या या उपक्रमात त्यांचे भक्क्म योगदान असल्याने सलग सातव्या वर्षी आम्ही हा उपक्रम करु शकलो, असेही त्यांनी सांगितले.

Updated : 23 Dec 2020 5:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top