पहिल्या मुलीच्या उपचारासाठी आई वडिलांनी दुसरी मुलगी 10 हजारात विकली
आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे आपल्या मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पालकांनी 12 वर्षाच्या लहान मुलीला 46 वर्षीय व्यक्तीला 10 हजारांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
X
सदर दांपत्याच्या मोठ्या मुलीला श्वसनाचा त्रास आहे. विकली गेलेली मुलगी चिन्ना सुब्बैया नावाच्या व्यक्तीने 10 हजारात विकत घेतली. चिन्नाने 24 फेब्रुवारी रोजी मुलीशी लग्न केले. महिला व बालकल्याण विभागाला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांच्या वतीने मुलीची सुटका करण्यात आली.
25 हजारांचा सौदा 10 हजारांत सेट
चिन्ना हा सदर परिवाराचा शेजारी असून परिवाराने मुलीची किम्मत 25 हजार सांगीतली होती. पण हे प्रकरण 10 हजारांत सेट झालं. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चिन्नाचं आधी एक लग्न झालं होतं. मात्र नेहमीच्या भांडणांमुळे ते वेगळे झाले.
मुलीला 'विकत' घेतल्यानंतर चिन्नाने 24 फेब्रुवारीच्या रात्री आपल्या नातेवाईकांकडे धामपूरला आणले. यावेळी शेजार्यांझनी मुलीला रडत आरडाओरड करताना पाहिलं, त्यानंतर काहीजण घरात आले. चौकशी केली आणि चिन्नाने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याची माहिती मिळतात त्यांनी सरपंचांकडे संपर्क साधला. सरपंचांना घटनेची मिळताच त्यांनी बाल विकास अधिकाऱ्यांना याची माहिती देत कारवायी केली.
या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.