लेकराचा हट्ट : रोहित पवार म्हणतात त्याने हट्ट केला आणि माझ्याकडे पर्यायच नव्हता
X
लेकराने एखादा हट्ट केला तर तो पुरवल्या शिवाय पालकांकडे दुसरा पर्याय नसतो. मग तो कोणिही असो. अगदी, राजकीय वर्तुळात दबदबा असणारी नेतेमंडळीसुद्धा. असंच काहीस रोहित पवारांच्या बाबतीत घडलंय.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही असाच एक बालहट्ट पुरवावा लागला आहे. राजकीय विश्वात अनेक अगदी सहजपणे वावरणाऱ्या आणि इतरांशी मनमिळाऊपणानं वागण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित पवार यांच्यातील वडील नेमका आपल्या मुलाचे हट्ट करण्यााठी काय करतो, हेच त्यांनी नुकतीच लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट सांगून जात आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
"दररोजच्या व्यस्त दिनक्रमामुळं मुलांना वेळ देता येत नाही, पण आज बऱ्याच दिवसांनी शिवांशला वेळ दिला. "बाबा किती दिवसापासून मला भेटला नाहीत तुम्ही", असं म्हणत माझ्यासोबत केस कापायला जाण्याचा हट्ट त्याने केला. अर्थात तो पूर्ण करण्याशिवाय मला पर्यायच नव्हता!"
दररोजच्या व्यस्त दिनक्रमामुळं मुलांना वेळ देता येत नाही, पण आज बऱ्याच दिवसांनी शिवांशला वेळ दिला. "बाबा किती दिवसापासून मला भेटला नाहीत तुम्ही", असं म्हणत माझ्यासोबत केस कापायला जाण्याचा हट्ट त्याने केला. अर्थात तो पूर्ण करण्याशिवाय मला पर्यायच नव्हता! pic.twitter.com/uahLfnTtq3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 17, 2021