‘पोरीला डाक्टर बनायचंय थोडी मदत करा...’ आईचं आवाहन
X
अवघी दोन वर्ष असताना वडिलांचं छत्र हरवलं, आई धुणीभांडी करून घर चालवतेय, राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही आहे. अशा परिस्थितीशी दोन हात करत तिने दहावीत 96 टक्के गुण मिळवले. ‘ती’ तीच नाव आहे सोनाली अशोक मोरे.
सोनाली सोलापुरातील चौत्रा पुणे नाका परिसरात राहते. घरची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने आई लोकांच्या घरची धुणीभांडी करून घर चालवते. अशा परिस्थितीही तीने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. सोनाली सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशालीची सोनाली विद्यार्थिनी आहे. तीला भविष्यात डॉक्टर व्हायचं आहे.
परिस्थितीशी दोन हात करत सोनालीने दहावीत 96 टक्के गुण मिळविल्याची वार्ता पसरताच अनेकांनी तिचे कौतुक आणि अभिनंदन केलं. मात्र कौतुक आणि अभिनंदन करण्याऐवजी डॉक्टर होण्याचं सोनालीच स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तीने सोनालीच्या मदतीसाठी पुढं याव असं आवाहन सोनालीच्या आईने केलं आहे.
https://youtu.be/uhrAG4G0tBM