१६ वर्षाची चिमुरडी बनली पोलीस अधिकारी...
X
लहानपणापासून आपण काही ना काही स्वप्न पाहत असतो. काहींना डॉक्टर व्हायचं असतं तर काहींना सरकारी अधिकारी.. या चिमुडीने पण असंच स्वप्न पाहिलं आणि ते साकार झालं सुध्दा!!
गुजरातच्या राजकोटमध्ये राहणारी ही १६ वर्षीय मुलगी जन्मापासून एचआयव्ही ग्रस्त आहे. पोलीस अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं.तिची ही इच्छा एक दिवसांसाठी का होईना पूर्ण झाली. राजकोटमध्ये २००३ पासून कार्यरत असणाऱ्या आणि एचआयव्ही ग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या 'डिस्ट्रीक्ट नेटवर्क ऑप पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही' या संस्थेनं २५ चिमुरड्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. ही संस्था एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनासाठी काम करीत असलेल्या या संस्थेद्वारे ‘विहान-केअर अँड सपोर्ट’ प्रकल्प यासारखे बरेच प्रकल्प एचआयव्हीग्रस्तासाठी चालू आहेत. संस्थेकडे काही मुलांनी मोबाईल, सायकल किंवा अशा इतर वस्तूंची मागणी केली होती. परंतु, एका मुलीनं मात्र आपल्याला पोलीस बनण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. तिला पोलीसांच्या पोशाखात एक दिवस का होईना पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा पूर्ण झाली.