Home > बचत गट > मसाला साम्राज्ञी कमलताई परदेशी यांचं निधन;शेतमजूर ते उद्योजिका असा थक्क करणारा राहिला प्रवास

मसाला साम्राज्ञी कमलताई परदेशी यांचं निधन;शेतमजूर ते उद्योजिका असा थक्क करणारा राहिला प्रवास

मसाला साम्राज्ञी कमलताई परदेशी यांचं निधन;शेतमजूर ते उद्योजिका असा थक्क करणारा राहिला प्रवास
X

शेतमजूर ते बचत गटाच्या माध्यमातून कोट्यवधींचा मसाला उद्योग उभ्या करणाऱ्या कमल परदेशी यांचं पुण्याच्या ससून रुग्णालयात ब्लड कॅन्सर ने वयाच्या ६३व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्या कॅन्सर शी झुंझ देत होत्या. आपल्या मसाल्याची चव सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या मसाला सम्राज्ञी अशी त्यांची ओळख होती.





पहा कसा होता कमलताईंचा प्रवास

कमलताई यांचा शेतमजूर ते उद्योजिका असा थक्क करणारा प्रवास राहिला आहे.

सन २००० साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून त्यांनी अंबिका मसालेचा उद्योग उभा केला. सुरवातीला झोपडपट्टीतून आपल्या व्यवसायाची सुरवात करणारा हा उद्योग त्यांनी सातासमुद्रापार नेला. आता त्यांचा मसाल्यांना भारतासह परदेशात मोठी मागणी आहे.




खुबटाव या छोट्याश्या गावातून त्यात झोपडपट्टीतून आपला व्यवसाय सुरु करणाऱ्या ताईंनी पुढे २००५ साली त्याच्या व्यवसायचा विस्तार करायचा ठरवलं .आणि त्यांनी त्याचा ब्रँड बनवला त्यांच्या मसाल्यांची चव पाहून बिग बझार ने त्यांच्या मसाल्यांना आपल्या स्टोअर्स मध्ये स्थान दिलं . सुरुवातीला छोटी छोटी पाकिटं बनवून ते पुण्याच्या कार्यलयाबाहेर विकणाऱ्या कमलताईंच्या मसाल्याची चव जर्मनी पर्यंत पोहचली .

त्यांना या प्रवासात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मोलाची मदत झाली . कोणत्याही अधिकारी व लोकप्रतिधीना त्या सहज भेटायला जात.अंबिका महिला औद्यीगिक संस्थेचा एवढा मोठा डोलारा उभा करून पण कमलाताईंचं रहाणीमान अतिशय साधं होतं.




Updated : 2 Jan 2024 9:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top