अकोल्याची मास्कवाली बाई...
X
कोरोनामुळे जाहिर झालेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांचे रोजगार गेले, यातून आलेल्या मानसिक तणावातून काहिंनी आत्महत्या केल्याच्या घटनासुध्दा समोर आल्या. मात्र ‘जिथं पुरुष थांबतो तिथून बाई सुरु होते’ याचा प्रत्यय अकोला वासियांना आला आहे.
झालय काय तर, लॉकडाउन काळात दिपीका देशमुख या महिलेने मास्क आणि पाणी पुरीचा व्यवसाय सुरु करुन पंन्नास हजारांहून अधीक मास्कची विक्री केली. याचा फायदा फक्त दिपीका देशमुख यांना झालेला नसून परिसरातील तब्बल 115 महिलांनासुध्दा झाला आहे.
घरातील जबाबदार व्यक्तीची तब्बेत ठिक नसल्याने सायकल दुरुस्तीच्या दुकानाची जबाबदारी दिपीका यांच्यावर पडली. सायकल दुरपस्तीची कोणतीही माहिती नसताना दिपीका यांनी हा व्यवसाय उत्तम रितीने सांभाळला. मात्र दिपीका यांनी गृहउद्योगात प्रवेश केला. सर्वोदय गृहउद्योग नावाने एका बचत गटाची त्यांनी सुरुवात केली. यात त्यांनी विवीध प्रकारचे मसाले, पापड बनवण्यापासून व्यवसायाला सुरुवात केली.
विशेष बाब म्हणजे दिपीका यांनी लॉकडाउन काळात संकटाला संधी समजून सर्वोदय गृहउद्योगा मार्फत मास्क बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. या काळात त्यांनी तब्बल पंनास हजारहून अधीक मास्कची निर्मीती केली असून परिसरातील तब्बल 115 महिलांनासुध्दा झाला आहे. या मास्क मध्ये विवीध डिझाइनचे मास्क, पैठणी मास्क, डायमंड मास्क अशा विवीध प्रकारचे मास्क बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
मास्क बनवण्याच्या व्यवसायासोबतच दिपीका यांनी सर्वोदय मार्फत रेडीमेड पार्सल पाणी पूरी विकण्यास सुरुवात केली. आज सर्वोदय बचत गटाच्या पाणी पुऱ्या संपुर्ण अकोल्या जिल्ह्यात फेमस झाल्या आहेत.
आज सर्वोदय महिला बचत गट मसाले, पापड, कुरडया, मास्क, रेडीमेड पाणी पूरी, इंस्टंच इडली पीठ, इंस्टंट ढोकळा पीठ ही उत्पादनं बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.