पुणेकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा महिला बचत गट मैदानात
X
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदीवस वाढत आहे. या आजारावर अद्याप तरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नसल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हाच यावरचा एकमेव उपाय असल्याचं बोललं जातं. त्यामुळे या आजारापासुन पुणेकरांना वाचवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचं आहे. म्हणूनच पुण्याच्या अभिनव महिला बचत गटाने विषमुक्त जेवणाची घरगुती मेस सुरु केली आहे.
या संकल्पनेची माहिती देताना गटाच्या अध्यक्षा हर्षदा टेमघरे म्हणाल्या की, "कोरोना काळात प्रतिकार शक्ती कशी वाढवावी याचे अनेक उपाय सुचवले जात आहेत. त्यात काढे, चुर्ण घेण्याचे सल्ले दिले जातत पण, हे सर्व आपल्या आहारातच आहे. आपण योग्य संतुलीत आहार घेतला तर वेगळ काही करण्याची गरज नाही. कारण, नैसर्गिक धान्य, कडधान्य, पालेभाज्या यामध्ये सर्व औषधी गुण आहेत. यातूनचं नैसर्गीक शेती व विषमुक्त जेवणाची संकल्पना सुचली." असं त्यांनी सांगीतलं.
जेवण तयार करण्याकरता या महिलांना सेंद्रीय भाजीपाल्यापासुन ते धान्यापर्यत सर्व गोष्टी पुरविल्या जातात. त्यानतंर मातीच्या आणि पितळेच्या भांडयामध्ये हे अन्न शिजविले जाते. तसेच एका डब्यामध्ये सँलेड, गायीचे तुप ही दिले जाते. अभिनव बचत गटात 1360 महिला काम करतात. त्यातील पंचवीस महिलांना रोजगार नसल्याने त्यांना विषमुक्त भोजन या उपक्रमात समाविष्ट करुन घेण्यात आले.
त्यामुळे त्यांना आता हक्काचा रोजगार मिळु लागला असुन निगडी, वारजे, सिंहगड रोज परीसरात याला सुरवात झाली आहे. माफक दरात हा डब्बा घरपोच नागरिकांना दिला जातो. त्यांनाही या उपक्रमाचे कौतुक वाटत आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने कोरोनाच्या काळात अशा पारंपारिक अन्नाची गरज असुन यातुन प्रत्येकांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.
https://youtu.be/1GyfOT41vKQ