Home > Auto > दुसऱ्याला गुळ देताना विचार करा कारण ...

दुसऱ्याला गुळ देताना विचार करा कारण ...

दुसऱ्याला गुळ देताना विचार करा कारण ...
X

मकर संक्रांतीनिमित्त लाडू, चिक्की, तीळाच्या वडीची मागणी वाढत असते. अशावेळी सेंद्रिय गुळाला मागणी त्याच्या प्रमाणात वाढत असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांनी गुळाची मागणी वाढली आहे. संक्रातीला लागणाऱ्या गुळाच्या किमतीत प्रतिकिलो 20 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तीळ-गुळाचा गोडवा यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तीळचा दर प्रतिकिलो 200 रुपये इतका झाला आहे. आणि शेंगदाण्याचा दर प्रतिकिलो १३० रुपये पर्यंत गेला आहे.

दरवर्षी मकरसंक्रात ही १४ जानेवारी साजरी केली जाते. मात्र यावर्षी मकर संक्रांत ही १४ जानेवारी ऐवजी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी घरोघरी गूळ, तीळ, शेंगदाणामिश्रित पदार्थ तयार करण्यात येतात. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वरील वस्तूंची मागणी वाढते. चिक्कीसाठी लागणाऱ्या गुळाची विक्री 40 रुपये प्रति किलो दराने होत आहे. सेंद्रिय गूळ 50 रुपये किलो दराने बाजारात विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात साधा गूळ प्रतिकिलो ६५ रुपये दराने बाजारात विकला जात आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी गूळ, शेंगदाणा, तीळ यांच्या भावात वाढ़ झाल्याने ग्राहकांना यावर्षी कमी खर्चात संक्रात साजरी करावी लागत आहे. त्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांच्या तिळ-गुळाचा गोडवा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि संक्रांतीवर थोड्याप्रमाणात का होई विरजण पडल्याचे दिसून येत आहे.


Updated : 12 Jan 2023 6:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top