मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Lockdown 4 च्या पहिल्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटावर मान्सूनपुर्वी मात करायची असल्याचं म्हटलं आहे. सोबतच राज्यातून स्थलांतरीत मजूर आपल्या स्वगृही मोठ्य़ा संख्येने परतले असल्यामुळे राज्यात मनुष्यबळ कमी पडत आहे. या संकटात भुमीपुत्रांनी पुढं येऊन महाराष्ट्राला आत्मनिर्भर करावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा...
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ
- राहूल गांधींवर टीकेप्रकरणी सीतारमण यांना ‘या’ बॉलिबुड अभिनेत्रीचं उत्तर
- निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य ऐकुन मला धक्काच बसला- अनिल देशमुख
‘करोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन आपल्याला करोना विरहित ठेवणं हे आपल्यापुढचं आव्हान आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा हे आपलं घोषवाक्य आहे. आता ग्रीनझोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यावं’ असंही आवाहन केलं आहे.
“३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाऊनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाऊनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाऊनमध्ये काढणार? याला काही उत्तर आहे का? जगात कुणाकडे करोनाचं उत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढलं जातं. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणं आणि जिंकणं हे कठीण आहे. लॉकडाउन वाढवणं हे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. मग आत्तापर्यंत काय केलं? हा प्रश्न पडलाच असेल. आपण मार्चपासून काळजी घेतो आहोत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत. आपण करोनाची श्रृंखला मोडू शकलेलो नाही. मात्र लॉकडाउनच्या गतिरोधकाने आपण करोनावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
“उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलं गेलं आहे. ज्यामुळे जग थांबलं आहे. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.