कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करण्यावरुन भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सतत वादविवाद होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा) योजनेचा आधार घेतला आहे. ‘UPA सरकारद्वारा लागू करण्यात आलेली मनरेगा योजना भाजप सरकारच्या काळातही श्रमिकांसाठी म्हत्त्वपुर्ण ठरते आहे. या योजनेला भाजप विरुद्ध काँग्रेस असा मुद्दा बनवू नका’ असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा...
- २० लाख कोटींचं पॅकेज म्हणजे गरिबांची क्रुर चेष्टा- सोनिया गांधी
- नरेंद्र मोदींचा राजकीय सूडभावनेतून महाराष्ट्रावर दरोडा
- पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, कोरोनाचं संकट टळल्यावर करणार ‘हे’ मोठं काम
सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या ‘ओपिनियन पीस’मध्ये म्हटलंय की, “मोदी सरकारने UPA सरकारच्या काळातील योजनेचा वापर केला. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांना मदत आणि योजना लाभ पोहोचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मनरेगा अंतर्गत पॅकेज घोषित केलं आहे.” त्यांनी पुढे लिहलं, एक सरकार ज्यांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आज त्यांनाच ही योजना उपयोगी पडली आहे.”
दरम्यान, भाजप सत्तेत येण्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वत: भाषणामध्ये मनरेगा योजना म्हणजे काँग्रेसच्या विफलतेचं जीवंत स्मारक असल्याचं म्हटलं होतं. सध्या याच योजनेच्या माध्यामातून स्थलांतरीत प्रवासी मजूरांना आपल्या गावात रोजगार उपलब्ध होणार असल्याचं कॉंग्रेसकडून म्हटलं जातंय. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.