सोनिया गांधींच्या माफीनाम्यावरून भाजप काँग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी

Update: 2022-07-29 07:24 GMT

राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदाबद्दल काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी चुकीची टिप्पणी केल्याने त्यांच्यावर भाजप ने तीव्र विरोध केला आहे .याबद्दल काँग्रेसने राष्ट्रपतींची माफी मागावी अशी मागणी भाजपच्या स्मृती इराणी यांनी केली आहे.

संसदेत याबद्दल गुरुवारी गदारोळ माजला.भाजपचे खासदार त्याचबरोबर भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तीव्र विरोध केला. या घटनेदरम्यान भारती पवार तिथे उपस्थित होत्या ,"जे घडलं ते अत्यंत दुःखद आहे राष्ट्रपतीपदासारख्या संविधानात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पदाबद्दल काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी चुकीची टिपण्णी केली आहे आणि त्याबद्दल काँग्रेसने माफी मागितली पाहिजे त्याचबरोबर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी सुद्धा माफी मागितली पाहिजे "असे मत भाजपच्या भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.

Full View

दरम्यान काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी स्मृती इराणी आणि भाजपच्या मागणीचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे ."स्मृती इराणी जे बोलतात ते चुकीचे आहे,अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे तरीपण तुम्ही सोनिया गांधींनी माफी मागावी म्हणत आहात,स्वतःचे गोवा प्रकरण लपवण्यासाठी हे सगळं करत आहात,आधी तू माफी माग सगळ्यांत मोठा गुन्हा तू केला आहेस.सोनिया गांधी माफी मागणार नाहीत,आधी तू माफी माग",या शब्दांत संगीता तिवारी यांनी तीव्र विरोध केला.

Tags:    

Similar News