शेतकऱ्यांच्या पीक खरेदीसाठी श्वेता महाले यांचं ठिय्या आंदोलन

Update: 2020-06-09 13:41 GMT

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावं लागलं आहे. बाजरपेठा बंद असल्यामुळे खरेदी विक्री पुर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता अनलॉक करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी शासनाने त्वरीत करावी अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले य़ांनी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

हे ही वाचा...

शेतकऱ्यांच्या मका पिकाच्या खरेदीसाठी अजूनही बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सहाशे रूपयाने नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. तसेच कापसाचे देखील उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे पूर्ण करावे अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्वेता महाले यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/rnonewsonline/videos/393451164899218/?t=169