शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना डावलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेत आल्या होत्या.
राज्यसभेत शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी; खैरे, रावतेंना डच्चू
पण सगळ्यांना डावलत उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. याविषयी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
"आदित्य ठाकरे ना (Aaditya Thackeray) प्रियांका चतुर्वेदींचं काम आवडलं असेल म्हणुन त्यांना उमेदवारी दिली असेल. आम्हीदेखील मराठवाड्यासाठी खुप काम केलं पण आमचं काम त्यांना दिसत नाही. मी स्मशानात जाईपर्यंत शिवसेनेत काम करत राहीन. मी कडवट शिवसैनिक आहे." अशी भावना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी व्यक्त केली.
“प्रियंका चतुर्वेदी चांगलं काम करतात. चांगलं इंग्रजीही बोलतात. मात्र तेवठ्यावरच चालत नाही. माझ्यासारखं कडवट बोलणारही कोणी असावं लागतं. मी मोदींना काय काय बोललोय. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण इकडे-तिकडे गेलो नाही.” असं खैरे यांनी म्हटलं आहे.