सक्षम नेतृत्व नसल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट

Update: 2020-06-12 08:19 GMT

सक्षम नेतृत्व नसल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी केलाय. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर प्रशासनानं लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केली असती तर, कोरोनावर मात करता आली असती असं मत रक्षा खडसे यांनी मांडलं.

जळगाव कोविड रुग्णालयात 82 वर्षाच्या बेपत्ता आजींचा मृतदेह आठ दिवसानंतर बाथरूम मध्ये सापडतो हे निंदनीय असून रुग्णालयात काय कश्या पद्धतीने उपचार होतात असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासन आणि आरोग्यव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.

जळगावमधील कोव्हिड रुग्णालयात बाधीत वृद्ध महिलेचा मृतदेह आठ दिवस बाथरूममध्येच पडून असल्याच्या प्रकरणी अखेर शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉ भास्कर खैरे यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी देशभर जळगाव प्रशासन तसंच आरोग्य यंत्रणेवर संतापाची लाट निर्माण झाली होती. आज अखेर शासकीय महाविद्यालयाचे डीन भास्कर खैरे यांच्यासह पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जळगाव कोव्हिड रुग्णालयातील 82 वर्षीय बाधीत वृद्ध महिला बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. सदर महिला कोव्हिड वॉर्डच्या स्वच्छतागृहात आठ दिवसानंतर मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. जळगाव कोव्हिड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2632883313699793/?t=0