राहूल गांधींवर टीकेप्रकरणी सीतारमण यांना ‘या’ बॉलिबुड अभिनेत्रीचं उत्तर
कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रवासी मजूरांसोबत बसून चर्चा करण्यावरुन अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) चांगल्याच भडकल्या होत्या. कॉंग्रेसने संकटाच्या काळात जबाबदारीने बोलावं असा सल्ला त्यांनी सोनिया गांधी यांनाही दिला होता. यावर बॉलिवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chaddha) हिने निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा...
- निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य ऐकुन मला धक्काच बसला- अनिल देशमुख
- राहुल गांधींच्या प्रवासी मजूरांच्या भेटीवर भडकल्या निर्मला सीतारमण
- #AatmanirbharBharat: मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटींची मोठी घोषणा
लॉकाडाऊनमुळे रोजगारावर गदा आलेले सर्व मजूर आपल्या घराच्या दिशेने धाव घेत आहेत. वाहनाची सोय मिळत नाही म्हणून बरेच मजूर प्रवासी आपल्या कुटुंबासोबत पायी चालत निघाले आहेत. घराकडे निघालेल्या कामगारांचा भुकेने, अपघाताने बळी जातोय. या कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बसुन त्यांनी विचारपूस केली. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामण यांना हा सर्व नाटकी प्रकार वाटला आहे.
‘जेव्हा मजूर दु:खात पायी आपल्या घरी जात आहेत. त्यांचा वेळ वाया घालवला गेला. त्यापेक्षा त्यांच्यासोबत पायी चालले असते असते. राहुल गांधी मजुरांच्या मुलांची बॅग हातात घेऊ शकले असते. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसने अधिक जबाबदारीने वागले पाहिजे.’ असं सीतारमण यांनी म्हटलं होतं.
यावर रिचा चड्डाने ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कृपया या मजुरांना वाहनाची व्यवस्था करा. ते सुखरुप घरी जातील. त्यांचा चालण्याचा खूप वेळ वाचेल असे रिचाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Please provide transport for them. That will save a lot more time as compared to walking.
Would save lives also, not just “time”. https://t.co/WeoZaCofBs
— TheRichaChadha (@RichaChadha) May 17, 2020