तीन दिवसांपूर्वी (सोमवारी) बीडच्या गेवराई तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली होती. गोविंदवाडी शिवारात, एक स्त्री जातीचं अर्भक आढळून आलं होतं. अज्ञात मातेने या मुलीला उसाच्या शेतात सोडून पळ काढला होता. त्यानंतर या नवजात मुलीवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हे ही वाचा..
- माझा संवाद अमित शाह आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी- पंकजा मुंडे
- निसर्ग चक्रीवादळ शांत, पुणे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू
- अभिनयाच्या दुनियेतला जादूगार.. अशोक सराफ
आज या मुलीची प्रकृती ठीक झाल्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयात भेट देऊन त्यांनी या मुलीचं नामकरण शिवकन्या असं केलं आहे. या शिवकन्येला पुढील काही दिवस काकू नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. सोशल माध्यमांवर पोस्ट करून संदीप क्षीरसागर यांनी याची माहिती दिलीय.
Courtesy : Social Media
दरम्यान, काही महिन्यांपुर्वी परळीमध्ये रेल्वे रुळावर काटेरी झुडुपात सोडून दिलेल्या अशाच एका नकोशीचं पालकत्व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया यांनी स्विकारलं होतं. या मुलीचंही नामकरण शिवकन्या असं करण्यात आलं होतं.