तरुणास मारहाणीवर जितेंद्र आव्हाडांची अप्रत्यक्ष कबुली

Update: 2020-04-08 00:10 GMT

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील एका तरुणाने केला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यानंतर राज्यभरात या प्रकरणाविषयी खळबळ माजल्यानंतर विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही या घटनेचा ट्वीटरच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. एकूणच या प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवरही सुरु झाली आहे.

विरोधक आणि सामान्य जनतेचा वाढता विरोध पाहता यावर आव्हाड यांनी ट्वीट करत आपल्या कृत्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन करताना स्पष्टीकरण दिलंय.

या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटंलय की, "तुम्ही अशा विकृतांना पाठिंबा द्याल. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल अशा खालच्या पातळीवर कोणी टीका केल्यावर तुम्ही काय कराल ? मी अशा गोष्टी खपवून घेणार नाही आणि त्यांना पाठिंबाही देणार नाही." अशा शब्दात स्पष्टीकरण दिलं आहे. या ट्वीटसोबत जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकरणाचं मुळ असलेला अश्लील फोटोही शेअर केला आहे.