मुंबईच्या संरक्षणासाठी मुंबई पोलिस कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. अशात काही पोलिसांनाही कोरोनाची विषाणूची लागण होते आहे. ऑर्थर रोड कारागृहातील कैदी आणि पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं गंभीर वृत्त नुकतंच समोर आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी ऑर्थर रोड कारागृह व लगतच्या पोलिस वसाहतीला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
हे ही वाचा...
- मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, महापालिकेने दिले चौकशीचे आदेश- महापौर
- ‘चंद्रकांत दादांनी प्रॉमिस मोडलं’, पंकजा मुंडेंनंतर भाजपच्या ‘या’ महिला नेत्याही नाराज
- उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज, वाचा काय म्हणाल्या 'त्या' चार उमेदवारांना?
ऑर्थर रोड तुरुंगाच्या संपूर्ण परिसराची पाहणी झाल्यानंतर महापौरांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापौर किशोरी किशोर पेडणेकर संवाद साधताना म्हणाल्या की, “ऑर्थर रोड कारागृहात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येत असून या सर्वांना चांगली आरोग्य सेवा देणे हे प्रथम कर्तव्य आहे.”
संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याची सूचना महापौरांनी यावेळी जी/ दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या संपूर्ण कोरोनाबाधित परिसराकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याची सूचना महापौरांनी यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना केली. त्याचप्रमाणे आपल्याला काही अडचणी असल्यास महापौरांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन महापौरांनी उपस्थितांना केले.
दरम्यान, राज्यभरात आतापर्यंत 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य पोलीस दलातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 88 पोलीस अधिकारी आणि 698 इतर पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 13 अधिकारी आणि 63 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या 703 कोरोनाबाधीत पोलिसांवर उपचार सुरू आहेत.