राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्यावर गेली आहे. मुंबईत कोरोना व्हायरस ची संख्या वाढत आहे. त्यातच आज राज्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसंच अधिकारी ऐकत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनीधी करत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला.
सायन मध्ये कोव्हीड 19 च्या मृत रुग्णांच्या जवळच रुग्णांवर उपचार करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी गलथान कारभार सहन केला जाणार नाही. गलथान कारभार, दफ्तर दिरंगाईला क्षमा केली जाणार नाही. असा सज्जड दम भरला आहे.
हे ही वाचा...
- मुंबई महापालिका अतिरिक्त नगर आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची वर्णी
- MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
- अर्णब गोस्वामींची कोंडी, दोन वर्षापुर्वीचं ‘ते’ आत्महत्या प्रकरण पुन्हा बाहेर