महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. मुंबईतील रुग्णसंख्या फारच चिंताजनक आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सरकार टीका करताना कोरोना रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप केला आहे. धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखाच्या घरात असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.
हे ही वाचा...
- Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी
- मग दारुड्यांना आता शासनदाता असं नाव ठेवावं- तृप्ती देसाई
- Fact Check | ‘या’ फोटोतील महिला खरंच तृप्ती देसाई आहेत का?
“देशात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे. त्यातच कोरोना व्हायरस चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार जे सांगत आहे. हे आकडे खरे नाही. मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सरकार आकडे लपवत आहे” असा आरोप नितेश राणे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केला होता.
या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pedanekar) यांनी,‘त्यांना आकडे लावायची सवय असेल, आम्हाला आकडे लपवायची सवय नाही’. असा टोला नितेश राणे यांना लगावला आहे… पाहा काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1143184026035383/?t=23