मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त नगर आयुक्तपदी आश्विनी भिडे (IAS Ashwini Bhide) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर कार्यरत जयश्री बोस यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार सोपवण्यात आला आहे.
हे ही वाचा...
- MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
- अर्णब गोस्वामींची कोंडी, दोन वर्षापुर्वीचं ‘ते’ आत्महत्या प्रकरण पुन्हा बाहेर
- सुरक्षा किटच्या मागणीवर डॉक्टरकडून नर्सला शिवीगाळ
मुंबई मेट्रो रेल्वे कोर्पोरेशन च्या माजी व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विनी भिडे कार्यरत होत्या. मुंबईत कोरोना ची संख्या वाढत असल्यामुळे या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
अश्विनी भिडे यांची नियुक्ती विशेष ठरली आहे. आरे मेट्रो कारशेड योजना राबण्यात त्या पुढे होत्या. झाडांच्या कत्तलीच त्यांनी समर्थन केलं होतं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आरे कारशेडला विरोध दर्शविताना भिडे यांना हटवण्याची मागणीही केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांची बदली करून त्यांच्या जागी IAS अधिकारी रणजित सिंह देओल याची नियुक्ती केली होती.
मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी?(Praveen Pardeshi) यांचीही बदली करण्यात आली आहे. परदेशी यांच्या जागेवर इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील.
अलिकडे अधिकारी लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत. अशा तक्रारी वारंवार येत आहेत. खासकरुन राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याबाबत अनेक मंत्री तक्रारी करत आहेत. त्यातच आज मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता परदेशी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी काम करतील.