पंकजाला विधानपरिषदेवर घेतलं नाही हा मलाही आश्चर्य़ाचा धक्काच

Update: 2020-06-11 14:05 GMT

बीडच्या राजकारणातील कट्टर विरोधक म्हणजे मुंडे बंधु –भगिणीची जोडी आणि त्यांच्यातील राजकीय वाद सर्वांनाच परिचीत आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांची बहिण आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी डावलल्यानंतर प्रथमच मत व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या...

विधानपरिषदेसाठी कोणाला संधी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरीही, पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतलं नाही हा मला सुद्धा आश्चर्याचा धक्का असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

“भारतीय जनता पार्टीमध्ये एक नवीन पर्व सुरु झालं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी का दिली नाही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण एखादा मंत्री विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात पराभुत होतो, पराभूत झाल्यानंतर त्यांना पुर्नरुजीवीत करण्यासाठी विधान परिषदेतून संधी देणं गरजेचं होतं. पण हा भाजपचा आतला प्रश्न असला तरी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतलं नाही हा मला सुद्धा आश्चर्याचा धक्का आहे.” असं मत धनंजय मुंडे खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलंय.